परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; एकाच दिवशी आठ उमेदवारी अर्ज दाखल
परभणी, 19 जानेवारी (हिं.स.) — परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून सोमवारी (दि. 19) परभणी तहसील कार्यालयात एकूण आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच सोमवारपर्यंत एकूण 435 नामनिर्देशनपत्रांची विक
On Monday, 8 applications were filed in Parbhani tehsil.


परभणी, 19 जानेवारी (हिं.स.) — परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून सोमवारी (दि. 19) परभणी तहसील कार्यालयात एकूण आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच सोमवारपर्यंत एकूण 435 नामनिर्देशनपत्रांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेसाठी पेडगाव गटातून देशमुख संतोष सुरेश, लोहगाव गटातून धनंजय माणिक देशमुख, तर दैठणा गटातून ज्योत्स्ना गणेशराव घाडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.पंचायत समिती निवडणुकीसाठी पेडगाव गणातून रोहिदास जनार्दन नवघरे, लोहगाव गणातून अच्युत बाजीराव वाघ, उखळद गणातून पार्वतीबाई रंगनाथराव अवकाळे, दैठणा गणातून नंदाबाई बळीराम कच्छवे, तर धसाडी गणातून दुर्गा संदीप खोंड यांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवार (दि. 21) असल्याने येत्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande