राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार नाशकात मनसेची बैठक
नाशिक, 19 जानेवारी (हिं.स.)। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यकारिणीत काही फेरबदल करण्यात येणार आहे. या बदलाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे लवकरच नाशिक शहरात येणार असून त्याच्या पूर्वतयारीसाठी पदाध
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार नाशकात मनसेची बैठक


नाशिक, 19 जानेवारी (हिं.स.)।

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यकारिणीत काही फेरबदल करण्यात येणार आहे. या बदलाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे लवकरच नाशिक शहरात येणार असून त्याच्या पूर्वतयारीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.

त्र्यंबक रोड येथील 'राजगड' या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात येथे सर्व उमेदवार व या बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील प्रचार, मतदान प्रक्रिया, उमेदवार यांचे मनोगत, त्यांच्या अडचणी, पराभवाची कारणे यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीस मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी सर्व निवडणुकीचा आढावा घेतला. जय-पराजयाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने व विश्वासाने पक्षाचे काम पुढे नेण्यासाठी आपण सर्व कटीबद्ध आहोत. येणाऱ्या काळात संघटनात्मक बदल करून पक्ष नवी उभारी घेईल याची शाश्वती त्यांनी दिली. प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख व अॅड. रतनकुमार इचम यांनी निवडणुकीचा आढावा घेऊन या काळात पदाधिकारी यांनी केलेले काम यांचा सर्व अहवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवला जाईल तसेच त्यांच्या आदेशाने पक्षात लवकरच बदल घडवण्यात येतील. त्यासाठी काही दिवसात राज ठाकरे हे सर्व उमेदवार यांची भेट घेणार असून पुढील वाटचाल व पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या प्रसंगी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, मनोज घोडके, प्रकाश गोसावी, गोकुळ जाधव, विभाग अध्यक्ष सचिन सिन्हा, नितीन माळी, विधानसभा निरीक्षक राकेश परदेशी व सर्व उमेदवार, पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande