
सोलापूर, 19 जानेवारी (हिं.स.)।
सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दोन हजार ७५८ केंद्रे असणार आहेत. या निवडणुकीसाठी साडेसात हजार बॅलेट युनिट (बीयू) आणि तीन हजार ३६६ कंट्रोल युनिट (सीयू) लागणार आहेत. महापालिकेत वापरलेले ३६०० बीयू आणि १५०० सीयू जिल्हा परिषदेसाठी मिळतील. परंतु, मशीनमधील सततचे बिघाड, बटण न दाबण्याच्या तक्रारींमुळे नाशिकच्या मालेगावातून देखील चार हजार बॅलेट युनिट व १७०० कंट्रोल युनिट सोलापुरात येणार आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी १२ लाख ७७ हजार ६१ पुरूष आणि ११ लाख ८२ हजार ८३ महिला व इतर ८३ मतदार आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत २१ जानेवारीला संपणार आहे. २७ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत प्रचारासाठी वेळ मिळणार आहे. तरीदेखील, महाविकास आघाडीतील काँग्रेस, उबाठा शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, एकत्र लढणार की स्वबळावर, याचा निर्णय झालेला नाही. दुसरीकडे भाजप स्वबळावरच लढेल, अशी चर्चा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड