अमरावती मनपामध्ये भाजप आणि युवा स्वाभिमान संघटना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत
अमरावती, 02 जानेवारी (हिं.स.) अमरावती महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील मतभेद अद्यापही संपलेले नाहीत. आमदार रवी राणा आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट होऊनही युवा स्वाभिमान संघटनेचे उमेदवार कायम असल्याची माहिती रवी राणा यांनी दिली. शहरा
अमरावती मनपामध्ये भाजप आणि युवा स्वाभिमान संघटना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत


अमरावती, 02 जानेवारी (हिं.स.) अमरावती महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील मतभेद अद्यापही संपलेले नाहीत. आमदार रवी राणा आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट होऊनही युवा स्वाभिमान संघटनेचे उमेदवार कायम असल्याची माहिती रवी राणा यांनी दिली. शहरातील ३४ ते ३५ प्रभागांमध्ये युवा स्वाभिमान संघटनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे अमरावती मनपामध्ये भाजप आणि युवा स्वाभिमान संघटना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, भाजप, युवा स्वाभिमान तसेच दोन्ही पक्षांतील बंडखोर असे एकूण ६८ उमेदवारांनी आज माघार घेतल्याची माहितीही रवी राणा यांनी दिली. भाजप जिथे मजबूत आहे तिथे भाजपचे, तर जिथे युवा स्वाभिमान संघटना मजबूत आहे तिथे त्यांचे उमेदवार निवडून येतील आणि परिस्थितीनुसार पाठिंबा दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande