कोल्हापूर महापालिका निवडणुकी साठी २७४ जणांची माघार : 543 उमेदवार रिंगणात
कोल्हापूर, 02 जानेवारी (हिं.स.)। कोल्हापूर महानगरपालिकेच्या जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी ८१ प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारां पैकी शेवटच्या दिवशी २०५ उमेदवारांनी माघार घेतली. तर या निवडणुकीत माघार घेतलेल्या एकूण उमे
महापालिका निवडणूक


कोल्हापूर, 02 जानेवारी (हिं.स.)।

कोल्हापूर महानगरपालिकेच्या जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या

निवडणुकीसाठी ८१ प्रभागातून

उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारां पैकी शेवटच्या दिवशी

२०५ उमेदवारांनी माघार घेतली. तर या निवडणुकीत माघार घेतलेल्या एकूण उमेदवारांची संख्या २७४ इतकी झाली त्यामुळे आता एकूण

५४३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी वीस प्रभागात निवडणूक होत आहे. १९ प्रभाग हे चार सदस्यीय आहेत. तर वीस क्रमांकाचा प्रभागात पाच सदस्य आहेत. तब्बल दहा वर्षांनी ही निवडणूक होत आहे. २०१५ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये महापालिका सभागृहाची मुदत संपली. गेली पाच वर्षे महापालिकेत प्रशासक राजवट सुरू आहे.

कोल्हापूर महापालिकेची निवडणुक 15 जानेवारी 2016 रोजी होत असून यामध्ये प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होत आहे. याबरोबरच वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, आम आदमी पक्ष यांनी एकत्र येऊन राजर्षी शाहू आघाडी केली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षानेही २९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. याशिवाय अनेक अपक्ष उमेदवाही रिंगणात आहेत.

आता होत असलेल्या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राजकीय पक्षाकडे उमेदवारांचा कल दिसून आला. पण पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने अनेक जणांनी बंडखोरी केली. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील बंडखोरी थांबविण्यासाठी नेत्यांनी गेले दोन दिवस पक्षीय पातळीवर प्रयत्न केले. अगदी मंत्री,राज्य पातळीवरील नेते यांनी संपर्क साधून कोणाला स्वीकृत नगरसेवकपद तर कोणाला अन्य समितीवर संधी देण्याची आश्वासने देऊन बंडखोरी रोखून माघार घेण्यास भाग पाडले. दिवसभर माघारीसाठी प्रयत्न केल्यानंतर

उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये माजी महापौर हसिना फरास, माजी नगरसेविका मायादेवी भंडारे, स्थायी समितीचे माजी सभापती इंद्रजित सलगर, माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांचा समावेश आहे. खासदारपुत्र, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी मागे घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार योगिता कोडोलीकर, श्रुती अमित पाटील, गीता अजित तिवडे, किरण रामचंद्र माजगावकर, नम्रता राकेश महाडिक, ऋतुजा अजित जाधव तेजस्विनी विजयसिंह माने, परवेज दिलावरखान पठाण, धनश्री तोडकर यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande