आजकाल दमदाटी करता येत नाही : चंद्रशेखर बावनकुळे
अकोला, 02 जानेवारी (हिं.स.)। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.. राज्यात धमक्या आणि ब्लॅकमेल करून बिनविरोध निवडून आणले जाताय. भाजपा आणि एकनाथ शिंदेंमध्ये चढाओढ सुरु आहे. प्रत्येक
Photo


अकोला, 02 जानेवारी (हिं.स.)।

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.. राज्यात धमक्या आणि ब्लॅकमेल करून बिनविरोध निवडून आणले जाताय. भाजपा आणि एकनाथ शिंदेंमध्ये चढाओढ सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी पालकमंत्र्याचा दबाव आणाला जातोय. याला तुम्ही लोकशाही म्हणता?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. यावर बोलताना बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

बावनकुळे म्हणाले, राऊत यांना सकाळी बोलायची सवयच आहे. भाजपसोबत जनमत आहे.. लोक कार्यकर्ते स्वतःहून भाजपला सहकार्य करीत आहे.. आजकाल दमदाटी करता येत नाही. त्यामुळे हे सर्व मनातून लोक करीत आहेत. त्यामुळे त्यांचे आभार तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई येथे प्रचारासाठी येत आहेत नाही हे माहित नाही पण कुठलातरी कार्यक्रम मुंबईला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याचे बावनकुळे म्हणाले. बंडखोर नाराज असलेल्यांची नाराजी दूर करू.. मात्र भाजपचा कार्यकर्ता हा संस्कारी असल्याचं बावनकुळे म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande