
नाशिक, 02 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज माघारी शेवटच्या दिवशी देखील गोंधळाची परिस्थिती कायम राहिली भाजप नेतृत्वाला बंडोबांना थंड करता आले नाही. पंचवटी प्रभागामध्ये एका अपक्ष उमेदवाराने भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून त्याच्या समर्थकांनी त्याला कोंडून ठेवले
नाशिकची महानगरपालिका निवडणूक ही सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरत आहे आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी देखील गोंधळाची परिस्थिती कायम राहिली. त्यापूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी अर्ज ची पळवा पळवी त्यानंतर शहराध्यक्ष सुनील केदार यांना नाशिक रोड विभागामध्ये घेराव घालून गाजर दाखविणे यासारख्या घटना घडल्या.
या घटना घडत असतानाच अर्ज माघारीच्या दिवशी देखील संकट मोचक गिरीश महाजन यांची मध्यस्थीता फारशी यशस्वी झाली नाही त्यांनी अनेकांना फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा केली तर काहींची प्रत्यक्ष भेटून चर्चा केली परंतु त्यातून सुवर्णमध्ये निघू शकला नाही यामध्ये बंडखोरी केलेले माजी महापौर अशोक मुर्तडक, शहर सरचिटणीस अमित घुगे, तसेच महाजन समर्थक आणि आमदार हिरे समर्थक म्हणून ओळख असलेले मुकेश शहाणे यांनी बंडखोरी कायम ठेवली त्यामुळे भाजपाला बंडखोरांचे बंड थंड करता आले नाही हे स्पष्ट झाले तर वार्ड क्रमांक 25 मध्ये सुरू असलेल्या गोंधळ थांबविण्यात महाजन यांना यश आले असून त्यांनी ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांना वार्ड क्रमांक 25 मधून आपला मुलगा दीपक बडगुजर आणि आपली बायको हर्षा बडगुजर यांचा उमेदवारी अर्ज हा मागे घ्यायला सांगितला पण मात्र वार्ड क्रमांक 29 मध्ये म्हणजेच माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासमोर असलेली उमेदवारी मागे घेण्यास बडगुजर यांनी नकार दिल्याने त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी कायम राहिली.
इंदिरानगर परिसरातील प्रभाग क्रमांक 31 मधून वंदना बिरारी या इच्छुक उमेदवार होत्या. मात्र भाजपाने अधिकृत उमेदवारी बाळा शिरसाठ यांना दिल्याने बिरारी दाम्पत्य नाराज होते. आज वंदना बिरारी आणि त्यांचे पती देवानंद बिरारी हे माघार घेण्याच्या प्रक्रियेसाठी सिडको महापालिका कार्यालयात आले असताना वादाला तोंड फुटले.शाब्दिक वादानंतर परिस्थिती बिघडली आणि दोन्ही बाजूंमध्ये वाद चिघळला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV