रत्नागिरी : बसणी पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे ११ जानेवारीला एकपात्री अभिनय स्पर्धा
रत्नागिरी, 2 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरी तालुक्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बसणी पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे ११ जानेवारीला तालुकास्तरीय एकपात्री अभियनय स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा ग्रंथालयाच्या सभागृ
रत्नागिरी : बसणी पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे ११ जानेवारीला एकपात्री अभिनय स्पर्धा


रत्नागिरी, 2 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरी तालुक्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बसणी पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे ११ जानेवारीला तालुकास्तरीय एकपात्री अभियनय स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा ग्रंथालयाच्या सभागृहात होणार आहे.

बसणी पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे १९९१ पासून एकपात्री अभिनय स्पर्धा गेली तीन वर्षे कै. श्रीधर कृष्णा पेटकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते. रत्नागिरी तालुक्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

स्पर्धक विद्यार्थ्यांना कोणत्याही नाटकातील एकांकिकेतील अथवा स्वलिखित उताऱ्यातील भाग सादर करता येईल. सादरीकरणासाठी कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त सात मिनिटांचा वेळ देण्यात येईल. ही स्पर्धा रविवारी सकाळी १० वाजता बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या सभागृहात सुरू होईल. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला १५०० रुपयांचे रोख पारितोषिक, द्वितीय १३०० रुपये, तृतीय ११०० रुपये तर उत्तेजनार्थ प्रत्येकी ५०० रुपयांची दोन पारितोषिके तसेच सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन बसणी पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande