चंद्रपूर: रिंगणात आता ४५१ उमेदवार
चंद्रपूर, 02 जानेवारी (हिं.स.)। येत्या १५ जानेवारीला मनपाची निवडणूक होणार आहे.यासाठी ५५६ उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता यापैकी ८३ उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज मागे घेतला.तर २२ अर्ज अवैध ठरले होते.त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात ४५१ उमेदवार मैदान
चंद्रपूर: रिंगणात आता ४५१ उमेदवार


चंद्रपूर, 02 जानेवारी (हिं.स.)।

येत्या १५ जानेवारीला मनपाची निवडणूक होणार आहे.यासाठी ५५६ उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता यापैकी ८३ उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज मागे घेतला.तर २२ अर्ज अवैध ठरले होते.त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात ४५१ उमेदवार मैदानात आहेत.

शुक्रवारी उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांमध्ये तुकुम विभागातून सहा, शास्त्रीनगर विभागातून सात, एमईएल विभागातून सहा, बंगाली कॅम्पमधून सहा, विवेकनगरमधून नऊ, औद्योगिक वसाहतीतून एक, जटपुरा विभागातून सहा, वडगावमधून एक, नगीनाबागमधून पाच, एकोरी मंदिरातून सात, भानापेठमधून अकरा, महाकाली मंदिरातून सहा, बाबूपेठमधून एक, भिवपूरमधून दोन, विठ्ठल मंदिरातून तीन आणि हिंदुस्तान लालपेठमधून चार उमेदवारांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विभागातून कोणीही आपले अर्ज मागे घेतले नाहीत.

--------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande