आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमासाठी स्वयंसेवक रवाना
छत्रपती संभाजीनगर, 02 जानेवारी (हिं.स.)। कोलाड, जिल्हा रायगड येथे आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्या आपत्ती व्यवस्थापनातील कामकाज या विषयाच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील एकूण ८० स्वयंसेवक रवाना करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे आण
एकूण ८० स्वयंसेवकांना आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पाठविण्यात आले


छत्रपती संभाजीनगर, 02 जानेवारी (हिं.स.)। कोलाड, जिल्हा रायगड येथे आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्या आपत्ती व्यवस्थापनातील कामकाज या विषयाच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील एकूण ८० स्वयंसेवक रवाना करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे आणि निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते ,मस्के मारुती, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी आपदा मित्र घेऊन रवाना होणाऱ्या वाहनास हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले .

प्रथम तुकडीतील एकूण ८० स्वयंसेवकांना आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पाठविण्यात आले. स्वंयसेवकांना प्रशिक्षणात एकूण बारा दिवसांमध्ये आपत्तीजन्य परिस्थिती, पूर परिस्थिती, भूकंप, आग लागणे, इतर आपत्तीमध्ये कशाप्रकारे नागरिकांची सुटका, बचाव आणि प्रतिबंधात्मक कार्य करावे, याचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे.यात स्वयंसेवकांसाठी किट, विमा कवच, व निवास आणि भोजनाची व्यवस्था पूर्णतः रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे प्रशिक्षणा दरम्यान करण्यात आली आहे. यानंतर, द्वितीय बॅच साठी इच्छुक स्वयंसेवकांनी जिल्हा प्रशासनाकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande