परभणी - सभा, रॅली, वाहन परवानगी आहे की नाही‌ याची पाहणी करण्याच्या सूचना
परभणी, 02 जानेवारी (हिं.स.)।परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकनिमित्त भरारी पथकाची बैठक निवडणूक अधिकारी तथा आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, नगरपालिका प्रशासन विभाग प्रमुख महेश गायकवाड, तहसीलदार संदीप राजापुरे, म
आपापल्या परिसरात सभा रॅली वाहन परवानगी आहे की नाही? याची पाहणी करणे,


परभणी, 02 जानेवारी (हिं.स.)।परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकनिमित्त भरारी पथकाची बैठक निवडणूक अधिकारी तथा आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, नगरपालिका प्रशासन विभाग प्रमुख महेश गायकवाड, तहसीलदार संदीप राजापुरे, मुख्यालय परीक्षक श्रीरंग भुतडा, कोषागार अधिकारी दत्ता भांगे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

या बैठकीत निवडणूक अधिकारी तथा आयुक्त नितीन नार्वेकर, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी सूचना व मार्गदर्शन केले. यावेळी निवडणूक अधिकारी यांनी सर्व भरारी पथक यांना आपल्या परिसरातील पाच पथकांची आपापल्या परिसरात सभा रॅली वाहन परवानगी आहे की नाही? याची पाहणी करणे, उमेदवाराची सभा रॅली घोषणा व वर्तमानपत्राची व बातम्यांची पाहणी करणे. मीडिया व प्रसारमाध्यम यांनी जाहिरातीची पाहणी रोजच्या रोज करणे, पैसा, दारू याची वाटप करणाऱ्यावर पंचनामा करून कारवाई करावी, एक खिडकी योजनेतून सर्व परवाने सभा, रॅली याची माहिती भरारी पथकाने घ्यावी, एसीसी पथक मार्फत प्रचार बंद झाल्यानंतर ७२ तास सतर्क राहुन नियंत्रण करावे. सभेच्या ठिकाणी भरारी पथकाने जाऊन व्हिडिओ क्लिक करून भरारी पथकाच्या प्रमुखाला देण्यात यावे, आचारसंहितेचा भंग करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी लेखा अधिकारी यांच्याकडे महापालिका निवडणुकनिमित्त

उमेदवाराचा खर्च ९ लाखापर्यंत आहे, अशा सूचना यावेळी दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande