
रत्नागिरी, 2 जानेवारी, (हिं. स.) : चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे स्पोर्ट्स डे हा उपक्रम ११ व १२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा डॉक्टर्स गॅदरिंग कार्यक्रम २४ जानेवारी रोजी डी स्टार रिसॉर्ट येथे होणार आहे, असे अध्यक्ष डॉ. संदीप भागवत यांनी सांगितले.
दरम्यान, असोसिएशनतर्फे २०२६च्या कॅलेंडरचे अनावरण हॉटेल तेज ग्रँड येथे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी फिनिक्स ऑर्थोपेडिक्स अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली येथील डॉ. ओंकार कुलकर्णी आणि डॉ. संतोष माळी उपस्थित होते. दोन्ही मान्यवर डॉक्टरांनी सांधेरोपणावरील आधुनिक शस्त्रक्रिया पद्धती तसेच हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि त्यावरील नव्या उपचारपद्धतींबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित डॉक्टरांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी