
परभणी, 02 जानेवारी (हिं.स.)।
येथील पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. व्ही. येवतीकर यांना राष्ट्रीय पशुवैद्यकीय अकादमी, नवी दिल्ली (भारत) यांचा सन 2024 चा प्रतिष्ठित ‘असोसिएट फेलो पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय विज्ञानाच्या प्रगतीसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल 22 डिसेंबर रोजी हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
डॉ. येवतीकर यांनी पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याच्या माध्यमातून केलेले योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या कार्यामुळे पशुधन विकास व पशुवैद्यकीय क्षेत्राला मोठी दिशा मिळाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, संशोधन तसेच पशुवैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis