
बीड, 02 जानेवारी (हिं.स.)।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठीच्या अराजपत्रित संयुक्त सर्व परीक्षा - 2025 ची जाहिरात उशिरा प्रसिध्द झाल्यामुळे अनेक पात्र व गुणवंत विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत.
आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, मागील वर्षीही याच कारणामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने 1 वर्षाची वय सवलत दिली होती. त्याच धर्तीवर यावर्षीही 1 वर्ष वय सवलत देण्यात यावी किंवा वय गणनेचा दि. 1 जानेवारी 2025 रोजीची तारीख गृहीत धरावी, अशी रास्त व न्याय मागणी एमपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्याविद्यार्थ्यांकडुन होत आहे.
या संदर्भात विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा सहानुभूतीपुर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी आज केली आहे. तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्षाच्या वयाची सवलत देण्याबाबत निर्णय करावा, ही विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis