पुर्णा शहराचा सर्वांगिण विकास करणार - आमदार गुट्टे
परभणी, 02 जानेवारी (हिं.स.)।पुर्णा शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. शहराचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, जनता ही मायबाप असून आपण जनतेचे सेवक आहोत याप्रमाणे चांगली कामे नगरसेवकांनी करावीत नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील कामांचे नियोज
नगरपरिषद नगराध्यक्ष म्हणून विमलबाई लक्ष्मणराव कदम यांनी पदभार स्विकारला.


परभणी, 02 जानेवारी (हिं.स.)।पुर्णा शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. शहराचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, जनता ही मायबाप असून आपण जनतेचे सेवक आहोत याप्रमाणे चांगली कामे नगरसेवकांनी करावीत नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील कामांचे नियोजन करून आराखडा सादर करावे त्याप्रमाणे निधी आणून कामे केली जातील, शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम जून पर्यंत पूर्ण करून शहराला स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यात येईल, असे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले. ते नगरपरिषदेच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्याच्या निमित्त बोलत होते.

नगरपरिषद नगराध्यक्ष म्हणून विमलबाई लक्ष्मणराव कदम यांनी पदभार स्विकारला. यावेळी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह संतोष एकलारे ,तालुका प्रभारी तसेच नगराध्यक्ष प्रतिनिधी नितीन उर्फ बंटी कदम, लक्ष्मणराव कदम, तालुकाध्यक्ष सुभाष देसाई, शहराध्यक्ष ॲड. राजेश भालेराव, नगरपरिषद कार्यालय अधिक्षक मुंतजीप खान, गटनेता अब्दुल मुजीब, मोकिंद भोळे, विश्वनाथ होळकर, अँड. गोविंद ठाकूर, अमोल ठाकूर तसेच नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, सुधाकर खराटे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande