
परभणी, 02 जानेवारी (हिं.स.)। चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. मागील वर्षीपासून विद्यार्थ्यांसाठीही शालेय व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष असून यावर्षीही 3 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत ही व्याख्यानमाला संपन्न होत आहे.
दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांब तालुका जिल्हा परभणी येथे सौ.उषा नितीन लोहट या 'आम्ही सावित्रीच्या लेकी' या विषयावर तर 5 जानेवारी 2026 रोजी ममता विद्यालय, गंगाखेड येथे प्रसिद्ध रंगकर्मी त्र्यंबक वडसकर 'बालरंगभूमी : निरीक्षणे आणि नोंदी' या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. दिनांक सहा जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माळीवाडा, पाथरी येथे 'आम्ही दुर्गप्रेमी' या विषयावर दत्ता राऊत हे आपले विचार मांडतील. दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी नरेंद्र गिरी माध्यमिक विद्यालय रावराजुर तालुका पालम येथे प्रा. कल्याण देशमुख 'वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आपण' या विषयावर तर दिनांक आठ जानेवारी 2026 रोजी जिजाऊ ज्ञानतीर्थ, मानवत रोड, ता .मानवत येथे प्रोफेसर भीमराव खाडे हे 'आजचे शिक्षण आणि बदलते संदर्भ' या विषयावर आपले विचार मांडतील.
दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत येथे माधव गव्हाणे 'पक्षी आणि आपले पर्यावरण' या विषयावर तर दहा जानेवारी 2026 रोजी विद्याप्रसारिणी सभा शाळा पूर्णा येथे पक्षीमित्र माणिक पुरी 'पक्षी येथे अंगणी' या विषयावर बोलतील. याच दिवशी नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेर बोरगाव तालुका सेलू येथे वन्य जीव अभ्यासक श्री. ज्ञानेश्वर गिराम हे 'जाऊ पक्ष्यांचिया गावा' या विषयावर तर सिद्धेश्वर विद्यालय, जिंतूर येथे वन्यजीव अभ्यासक आणि छायाचित्रकार विजय ढाकणे 'वनोपनिषदांच्या नोंदी आणि निरीक्षणे' या विषयावर आपले विचार मांडतील.
12 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभकर्ण टाकळी येथे शिवव्याख्याते सुभाष ढगे हे 'मांसाहेब जिजाऊ तेजाचा वारसा' या विषयावर समारोपीय व्याख्यान देतील.या व्याख्यानमालेस विद्यार्थ्यांसोबतच परिसरातील नागरिकांनीही उपस्थिती दर्शवून व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन चतुरंग प्रतिष्ठान, परभणीचे अध्यक्ष श्री. विलास पानखडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis