
नांदेड, 02 जानेवारी (हिं.स.)। मुखेड नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.विजया धोंडूराम देबडवार यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्याधिकारी राजेश जाधव यांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या .
यावेळी गटनेते म्हणून विनोद आडेपवार यांची निवड करण्यात आली.यावेळी माजी आमदार सुभाषराव साबणे,माजी नगराध्यक्ष बाबू सावकार,देबडवार डॉ.अतुल देबडवार,टी.व्ही सोनटक्के, कल्याण पाटील,सुनील मुक्कावार, कृष्णा देबडवार,पंकज गायकवाड, शिवा मुद्देवाड,शाम पाटील इंगोले, शंकर पाटील उमाटे,जयप्रकाश कानगुले,सचीन पाटील इंगोले, गजानन महाजन,यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis