देशमुखांचे २६ बंडखोर रिंगणात; रणनीती ठरविण्यासाठी दिवसभर घेतल्या बैठका
सोलापूर, 2 जानेवारी, (हिं.स.)। महापालिका निवडणुकीत भाजपने आ. विजयकुमार देशमुख आणि आ. सुभाष देशमुख यांच्या २६ उमेदवारांचे पत्ते कापले. या २६ जणांची बंडखोरी आणि देशमुखांची रणनीती भाजपसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बंडखोरांकडे शुक्रवारी
देशमुखांचे २६ बंडखोर रिंगणात; रणनीती ठरविण्यासाठी दिवसभर घेतल्या बैठका


सोलापूर, 2 जानेवारी, (हिं.स.)। महापालिका निवडणुकीत भाजपने आ. विजयकुमार देशमुख आणि आ. सुभाष देशमुख यांच्या २६ उमेदवारांचे पत्ते कापले. या २६ जणांची बंडखोरी आणि देशमुखांची रणनीती भाजपसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बंडखोरांकडे शुक्रवारी लक्ष असणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी ३ पर्यंतची मुदत आहे. भाजपने एकूण २६ प्रभागातून १०२ जणांना उमेदवारी दिली. आ. विजयकुमार देशमुख यांच्या शिफारशीनुसार ३०, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आ. देवेंद्र कोठे ४८, आ. सुभाष देशमुख २१ आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या शिफारशीनुसार तीन जणांना उमेदवारी मिळाली.

जागा वाटपात आ. कोठे यांनी बाजी मारली. त्यासाठी त्यांनी पक्षाकडे सबळ कारणे दिली. मात्र, यातून संघर्ष उभा राहिला आहे. या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी दोन देशमुखांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या. या बैठकीतील रणनीती यशस्वी ठरते की नाही याचा उलगडा होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande