
छत्रपती संभाजीनगर, 02 जानेवारी (हिं.स.)।भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी निःशूल्क प्रशिक्षण दिले जाते. छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि.१९ जानेवारी ते ३ एप्रिल या हे प्रशिक्षण दिले जाते. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थीनी दि.१८ रोजी सकाळी १० वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर राहावे. प्रशिक्षणार्थीना निशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे दि.१८ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी Department of Sainik Welfare,Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील CDS- 66 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन घ्यावे.
पात्रताः-
अ) उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
आ) उमेदवार लोकसंघ आयोग UPSC नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी. डी. एस या परिक्षेकरिता ऑनलाइन द्वारे अर्ज केलेला असावा.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई मेल आय डी : training.pctcnashik@gmail.com दूरध्वनी क्र. आणि 0253-245132 किंवा व्हाटसप क्र . 9156073306 (प्रवेश पत्र मिळविण्यासाठी ) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis