राजकीय नेता स्वतःचा स्वार्थ शोधतोय मग सोलापूरचा विकास कोण करणार ?
सोलापूर, 02 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी राज्यभरात गाजतेय. एकीकडे भाजपमध्ये अंतर्गत बंडाळीची भाषा स्थानिक आमदार करतायत. तर महाविकास आघाडीत जागा वाटपचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे. सकाळ
राजकीय नेता स्वतःचा स्वार्थ शोधतोय मग सोलापूरचा विकास कोण करणार ?


सोलापूर, 02 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी राज्यभरात गाजतेय. एकीकडे भाजपमध्ये अंतर्गत बंडाळीची भाषा स्थानिक आमदार करतायत. तर महाविकास आघाडीत जागा वाटपचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे. सकाळी एका पक्षात असलेले नेते संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जातायत. या सगळ्यात सर्वसामान्य सोलापूरकर मात्र हैराण झाले आहते. प्रत्येक राजकीय नेता स्वतःचा स्वार्थ शोधतोय मग सोलापूरचा विकास कोण करणार असा प्रश्न सोलापुरातील नागरिकांना पडलाय.

सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी निवडणूक होत आहे. मागील 2017 च्या निवडणुकीत 102 जागांपैकी भाजपला 49 जागा मिळाल्या होत्या. शिवसेना 21, काँग्रेस 11, एमआयएम 9, राष्ट्रवादी 4, बसपा 4, माकप 1 अशा प्रकारे पक्षीय बलाबल होते. आता यंदा सोलापूर महापालिका निवडणूक 2026 च्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे येत्या 16 जानेवारीला कळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande