विज्ञानामुळे अंधश्रद्धा दूर होते : ऍड. उद्धव कराड
बीड, 02 जानेवारी (हिं.स.)।शिक्षण हे जिवनामध्ये फार महत्वाचे आहे. विज्ञान हे तत्वावर व सिध्दांतवर आधारित आहे. तर विज्ञान प्रदर्शन म्हणजे हिरे शोधण्याचा प्रयत्न आहे. यातूनच मोठे शास्त्रज्ञ निर्माण होतात. विज्ञानामुळे अंधश्रद्धा दूर होते. असे प्रतिपाद
साने गुरुजी विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात


बीड, 02 जानेवारी (हिं.स.)।शिक्षण हे जिवनामध्ये फार महत्वाचे आहे. विज्ञान हे तत्वावर व सिध्दांतवर आधारित आहे. तर विज्ञान प्रदर्शन म्हणजे हिरे शोधण्याचा प्रयत्न आहे. यातूनच मोठे शास्त्रज्ञ निर्माण होतात. विज्ञानामुळे अंधश्रद्धा दूर होते. असे प्रतिपादन बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केजचे अध्यक्ष ऍड. उद्धव कराड यांनी केले.

केज येथे गटशिक्षणाधिकारी कार्यालय व साने गुरुजी निवासी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे समापन प्रसंगी उद्धव कराड हे बोलत होते. कार्यक्रमास प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे, सानेगुरुजी संकुलाच्या प्राचार्या डॉ. कविता गित्ते- कराड, विशेष शिक्षक गणेश वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना कराड म्हणाले प्रयत्नांती परमेश्वर नसून प्रयत्न हाच परमेश्वर आहे. म्हणून आपण सतत प्रयत्न केले पाहिजे, संशोधन करून यशस्वी होऊ शकतो. शोधाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा हे कळले पाहिजे. गरज ही शोधाची जननी आहे. माणसाच्या जसजशा गरजा वाढत गेल्या. तसतसे शोध लागलेले आहेत. माणसाला सुखर होईल असे उपकरण तयार केले पाहिजे. प्रगतीचे नव नवे टणे पार करीत मानवाने पादाक्रांत केले आहे. असे मत व्यक्त केले.

बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केजचे अध्यक्ष ऍड, उद्धव कराड यांनी विद्याथ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोण समजावून सांगितला, अंधश्रद्धेविषयी विद्याथ्यर्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. अतीशय ज्ञानवर्धक हा कार्यक्रम होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande