सेवानिवृत्त सनदी अधिकारी भास्कररव मुंढे यांचा 'परभणीभूषण' पुरस्काराने गौरव
परभणी, 02 जानेवारी (हिं.स.)। परभणी जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेतीसोबत मोठे प्रक्रिया उद्योग उभे राहिले, तरच जिल्ह्याचा खरा विकास साधता येईल असे प्रतिपादन कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांनी केले. येथील श्री शिवाजी महाविद्य
सेवानिवृत्त सनदी अधिकारी भास्करराव मुंढे यांना 'परभणीभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले


परभणी, 02 जानेवारी (हिं.स.)। परभणी जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेतीसोबत मोठे प्रक्रिया उद्योग उभे राहिले, तरच जिल्ह्याचा खरा विकास साधता येईल असे प्रतिपादन कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांनी केले.

येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित समारंभात जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी भास्करराव मुंढे यांना 'परभणीभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी उद्योजक सुनिल रायठठ्ठा (जालना) हे होते. याप्रसंगी ॲड.रमेशराव दुधाटे गोळेगावकर, पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. आसाराम लोमटे, अँड. माधुरी क्षीरसागर यांच्यासह भास्करराव मुंढे यांच्या सुविद्य पत्नी सौ.शामल मुंढे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना कृषितज्ज्ञ बोराडे म्हणाले की, मराठवाड्यात किमान २२ टक्के जंगल क्षेत्र आवश्यक असून सध्या ते केवळ ३ टक्क्यांवर असल्याने पर्यावरणीय समतोल बिघडत आहे. ते पुढे म्हणाले की, “मातीचं काम केलं की पाण्याचं काम होत राहतं,” असा अनुभव शेती आणि जलव्यवस्थापनातून आला आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यातील जमीन सुपीक असूनही विकास का नाही?

याचे आत्मपरीक्षण पुढच्या पिढीने करावे. परभणी जिल्हा मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा असूनही प्रत्यक्षात अपेक्षित पाणी उपलब्ध होत नाही, ही शोकांतिका आहे. साधनसंपन्नता विपुल असूनही विकास परिवर्तन घडत नाही आणि

कोर्टातून मिळवलेलं पाणी शेतकऱ्याचं राहत नाही; ते प्रामुख्याने उद्योजकांच्या हितासाठी वापरलं जातं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे नदी खोलीकरण, शुद्धीकरण आणि स्थानिक जलसंधारण अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्योजक रायठठ्ठा यांनी 'परभणी जिल्ह्यातील उद्योगविश्व' या विषयावर बोलताना शिक्षणासोबत रोजगारनिर्मिती आवश्यक असल्यावर भर दिला. “तरुण उद्योजक उभे करणे ही काळाची गरज आहे,” असे सांगत त्यांनी पॉलिटेक्निक शिक्षणाच्या दर्जेदार उपग्रेडेशनवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना छोट्या-छोट्या शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी सुचविले.

माध्यमांबाबत बोलताना त्यांनी चीनचे उदाहरण देत सांगितले की, तिथे वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर नकारात्मक बातम्या नसतात तर उद्योगविश्व व नवनवीन संशोधन असते. मुलांच्या कौतुकाच्या, त्यांच्या यशाच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध झाल्या पाहिजेत.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande