खा.चंद्रशेखर आजाद यांची आजाद समाज पार्टी मुंबईत १५ जागेवर लढणार
मुंबई, 02 जानेवारी (हिं.स.)। काँग्रेस पक्षाने हव्या असलेल्या जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे खासदार ऍड चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पार्टी (कांशिराम ) हा पक्ष मुंबईतील १५ जागा स्वबळावर लढविणार आहे . या उमेदवारांच्या प्रचारासाठी खा.
खा.चंद्रशेखर आजाद यांची आजाद समाज पार्टी मुंबईत १५ जागेवर लढणार


मुंबई, 02 जानेवारी (हिं.स.)। काँग्रेस पक्षाने हव्या असलेल्या जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे खासदार ऍड चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पार्टी (कांशिराम ) हा पक्ष मुंबईतील १५ जागा स्वबळावर लढविणार आहे . या उमेदवारांच्या प्रचारासाठी खा. आजाद मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत .

खा. चंद्रशेखर आजाद यांच्या सूचनेनुसार आजाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र कमिटीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली होती यावेळी झालेल्या चर्चेत स्थानिक कमिटीसोबत चर्चा करण्याचे ठरविण्यात आले होते . मात्र काँग्रेसच्या राज्यातील स्थानिक नेत्यांमध्ये ताळमेळ व विसंवाद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आजाद समाज पार्टीने राज्यातील २८ महानगरपालिकेत स्वतःचे उमेदवार उभे लेल्याची माहिती या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांनी दिली .

तर मुंबईत आजाद समाज पार्टीने सांगितलेल्या जागा सोडण्यास काँग्रेसने असमर्थता व्यक्त केल्यानंतर या ठिकाणी १६ जागांवर उमेदवार देण्यात आल्याची माहिती मुंबई अध्यक्ष कैलास जैसवार यांनी दिली . या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार ऍड चंद्रशेखर आजाद ११ जानेवारी रोजी मुंबईतील चांदिवली वार्ड क्रमांक १६४ येथील उमेदवार अशोक कांबळे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार असल्याचे साठे यांनी सांगितले .

आजाद समाज पार्टी (कांशिराम )यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांची अंतिम यादी .

१). फारूक मन्नान ख़ान-२०

२)-संदेश सोनावणे - ५७

३)शेख अब्दुल्ल जाहिद ४८

.४) नाजीब शेख ९२

५) विजय सखाराम कांबले - १२०.

६)हुसैन मोहम्मद शेख़ १२५

७) सादिक अली शाह -१३५

८) अॅड.महेंद्र भिंगारदिवे -वाॅर्ड क्र.१४६

९)अशोक कांबळे १६४.

१०) राबिया जाहिद अली शेख १८४

११) पाककीयराज अंबलग -१८५

१२) मेहबूब हुसैन मधुनवार -२२५

१३) जाहिद अली शेख १८८

१४) भुषन नागवेकर १८७

१५) आलिया फातिमा सरदार २१३

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande