रविवारी माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गांवर मेगा ब्लॉक
मुंबई, 02 जानेवारी (हिं.स.) - मध्य रेल्वे, मुंबई विभागाच्या उपनगरीय मार्गांवर ०४.०१.२०२६ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक परिचालित करण्यात येणार आहे, खालीलप्रमाणे: मुख्य मार्ग माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्
रविवारी माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गांवर मेगा ब्लॉक


मुंबई, 02 जानेवारी (हिं.स.) -

मध्य रेल्वे, मुंबई विभागाच्या उपनगरीय मार्गांवर ०४.०१.२०२६ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक परिचालित करण्यात येणार आहे, खालीलप्रमाणे:

मुख्य मार्ग

माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गांवर ११.०५ ते ३.५५ पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १०.१४ ते १५.३२ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावरून पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.

ठाणे येथून ११.०७ ते १५.५१ वाजेदरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड स्थानकावरून अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड ते माटुंगा दरम्यान या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकांवर थांबतील. माटुंगा स्थानकावरून गाड्या पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्य स्थानकावर सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ट्रान्स - हार्बर लाईन:

ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील अप आणि डाउन मार्गावरील सेवा ११.१० ते १६.१० पर्यंत बंद राहतील

ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ठाणे येथून १०.३५ ते १६.०७ वाजेदरम्यान वाशी / नेरूळ / पनवेलकडे जाणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि

पनवेल / नेरूळ / वाशी येथून ठाणेकडे जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा १०.२५ ते १६.०९ वाजेपर्यंत रद्द राहतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande