
बीड, 02 जानेवारी (हिं.स.)। स्वा. सावरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 'विस्तार सेवा' उपक्रमांतर्गत 'कुटुंब प्रबोधन' कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था पदाधिकारी आपल्या कुटुंबासह सहभागी झाले. प्रा. एस. एन. कुलकर्णी यांनी संवाद वाढवण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, कुटुंब हो संस्कारांची पहिली शाळा आहे. डिजिटल युगात एकत्र राहूनही माणसे दुरावत आहेत. त्यामुळे घरातील संवाद जपणे आवश्यक
आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम कुलकर्णी होते. मंचावर डॉ. अविनाश देशपांडे, प्रमोद कुलकर्णी,
विठ्ठल काळे, प्रा. बाळासाहेब साळवे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis