
अमरावती, 20 जानेवारी (हिं.स.)
महापालिका निवडणुकीत एकूण २२ प्रभागांतून ८७ सदस्य निवडून आले असून त्यापैकी २९ हिंदी भाषी उमेदवार विजयी झाले आहेत. या हिंदीभाषी नगरसेवकांमध्ये मुस्लिम समाजातील सर्वाधिक १८, सिंधी समाजातील ५ आणि राजस्थानी समाजातील १ नगरसेवकाचा समावेश आहे.विजयी हिंदीभाषी नगरसेवकांमध्ये बबलू शेखावत, रतन डेंडडुले, शेख जफर, इस्माईल लालूवाले, ललिता सुरेश रतावा, पूजा अग्रवाल, दीपक साहू, मनीष बजाज, स्नेहा लुल्ला, श्रीचंद तेजवानी, महेश मूलचंदानी, गौरी मेघवानी, अजय जयस्वाल, लुबना तनवीर, इकबाल साहिल, राशीद अली, खान आसिया अंजुम वहीद, मीर अहमद अली, कुबरा बानो, सलाउद्दीन, शाह अफसरजहाँ, शाह बीबी बतुल ताहेर, मरियम बानो, मोह. रेहान, शेख हमीद, नुजहत परवीन, नजीब खान यांचा समावेश आहे.
दरम्यान, महिला नगरसेवकांच्या विजयात भाजप आघाडीवर राहिली आहे. भाजपकडून १७ 'लाडक्या बहिणी' विजयी झाल्या असून महिलांच्या विजयाच्या बाबतीत भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपनंतर काँग्रेसच्या ८ महिला, युवा स्वाभिमानच्या ७, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या ३ महिला विजयी झाल्या आहेत. याशिवाय बसपा, शिंदे गटाची शिवसेना आणि उबाठा शिवसेना यांच्याकडून प्रत्येकी १ महिला नगरसेवक विजयी झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी