रत्नागिरी पालिका विविध समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध
रत्नागिरी, 20 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरी पालिका विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड आज बिनविरोध पार पडली. यामध्ये शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी समीर जगन्नाथ तिवरेकर यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभाप
रत्नागिरी पालिका विविध समित्यांच्या सभापतींची निवड


रत्नागिरी, 20 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरी पालिका विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड आज बिनविरोध पार पडली.

यामध्ये शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी समीर जगन्नाथ तिवरेकर यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी संतोष दत्तात्रय कीर, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी निमेश विजय नायर स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी श्री. राकेश चंद्रकांत नागवेकर, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी सुहेल अब्दुल लतीफ साखरकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी श्रीमती प्रिती रवींद्र सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन निवड झालेल्या सभापतींकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande