
अकोला, 20 जानेवारी (हिं.स.)।
सोलापूरमध्ये केलेल्या कथित भडकाऊ आणि उत्तेजक विधानांच्या प्रकरणात समाजसेवक जावेद जकरिया यांनी विधायक संग्राम अरुण जगताप यांच्या विरोधात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीची पुढील सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे. या सुनावणीकडे शहरासह राज्यातील राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे विशेष लक्ष केंद्रीत झाले आहे.ही तक्रार वरिष्ठ फौजदारी अधिवक्ता अधि. नजीब शेख यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आली आहे.
यापूर्वी माननीय न्यायाधीश श्री. एन. ए. शर्मा (पाचवे सह-न्यायाधीश) यांनी तक्रारदार जावेद जकरिया यांच्या विधानांचे व्हेरिफिकेशन पूर्ण केले आहे। येणाऱ्या तारखेला साक्षीदारांची विधाने नोंदवली जाण्याची अपेक्षा असून, त्या आधारावर पुढील न्यायालयीन प्रक्रिया ठरणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण विशेष चर्चेत आहे.
आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की २१ जानेवारीला प्रकरण प्रत्यक्ष सुनावणीसाठी घेतले जाते की पुन्हा एकदा फक्त पुढील तारीख दिली जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे