अकोला : भाजपकडून ठाकरे गटाला फोडण्याचा प्रयत्न तर राष्ट्रवादी काँग्रेसही भाजपच्या संपर्कात
अकोला, 20 जानेवारी, (हिं.स.)। महापालिकेत भाजपकडून आता बहुमताचा आकडा गाठण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. बहुमताचा आकडा गाठता यासाठी भाजपकडून विरोधक असलेल्या पक्षांच्या सोबत गुप्त बैठ
अकोला : भाजपकडून ठाकरे गटाला फोडण्याचा प्रयत्न तर राष्ट्रवादी काँग्रेसही भाजपच्या संपर्कात


अकोला, 20 जानेवारी, (हिं.स.)।

महापालिकेत भाजपकडून आता बहुमताचा आकडा गाठण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत.

बहुमताचा आकडा गाठता यासाठी भाजपकडून विरोधक असलेल्या पक्षांच्या सोबत गुप्त बैठकी सुरू असल्याचीही चर्चाही रंगली आहे. तर भाजपने ठाकरेंच्या सेनेवरही आपला गळ टाकून बघितला असल्याची चर्चा आहे. ठाकरे सेनेचे चार नगरसेवक भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी सेनेच्या गोटात खबरदारीचा उपाय म्हणून हालचाली तेज झाल्या असताना आमचा कोणताही नगरसेवक फुटणार नसल्याचा खुलासा शिवसेनेने केल्याने भाजपच्या मानसुब्यांवर सध्यातरी पाणी फेरल्याचे दिसत आहे.

तर दुसरीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चाही सुरू आहे. गेल्या दोन दिवसात ठाकरे गटाचे चार नगरसेवक आपला फोन बंद करून बसल्याने मोठा गोंधळ उडाला होता. ठाकरे गटाचे अकोला महापालिकेत सहा नगरसेवक विजयी झाल्यावर भाजपने त्यांच्यापैकी चार लोकनावर गळ टाकून बघितला त्याची कुणकुण सेनेचे उपनेते आ. नितीन देशमुख याना लागल्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात आल्यावर शिवसेना पक्ष फोडण्याचा अपयशी प्रयत्न झाल्याचे दिसून आले. अकोल्यात सतत स्थापन करण्यासाठी भाजपला दोन नगरसेवकांची गरज असून त्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून विविध मार्गांनी छोट्या पक्षांना दाणे टाकण्याचे काम सुरु असल्याचे दिसत आहे. भाजपचे माजी नगरसेवक आशिष पवित्रकार अपक्ष म्हणून विजयी झाल्यावर पक्षाने ते आपल्यासोबत येतील असे गृहीत धरले असून माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यामार्फत पवित्रकार याना नमवून पक्षात आणले जाईल त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम वापरले जाईल असे सांगण्यात येत आहे. शिदि सेनेच्या उषाताई वीरक किंवा महानगर विकास आघाडीच्या नगरसेवकाने वेळेवर ताठर भूमिका घेतल्यास धोका नको म्हणून भाजप इतर पक्षाला चाचपडत असल्याचे दिसत आहे.

शरद पवार यांची राष्ट्रवादी संपर्कात!

राज्यात विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची अकोल्यात महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला साथ देणार असल्याची चर्चा सुरू आहे. अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी एकूण 41 नगरसेवकांची आवश्यकता आहे यामध्ये भाजपकडे 38 नगरसेवक आहेत तर भाजपला सत्ता स्थापनेसाठी 3 नगरसेवकांची आवश्यकता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 3 नगरसेवक निवडून आले आहेत.अकोल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची आघाडी म्हणून ही निवडणूक लढली आहे मात्र आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार भाजप सोबत जाणार असल्याची चर्चा सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.तर या संदर्भात अकोल्यातील शरद पवार पक्षाचे काही पदाधिकारी पक्षाच्या वरिष्ठांना भेटण्यासाठी पुण्यात गेले असल्याची माहिती समोर येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande