
लातूर, 20 जानेवारी (हिं.स.)।
श्री छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राउंडवर पार पडला भव्य शपथविधी समारंभ !
प्रशिक्षणानंतर भारत-पाक आणि भारत-बांगलादेश विशाल सीमेच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाणा
सुरक्षा दल, चाकूर (महाराष्ट्र) च्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्राच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राउंडवर नुकतीच सीमा सुरक्षा दलातील ३३४ नवीन हवालदारांचा भव्य शपथविधी समारंभ परेड उत्साहात संपन्न. या शपथ परेडची सलामी श्री विनीत कुमार, महानिरीक्षक, सहायक प्रशिक्षण केंद्र, सीमा सुरक्षा दल, चाकूर यांनी घेतली.
या नेत्रदीपक परेडचे नेतृत्व प्रशिक्षीत हवालदार अंबर पांडे यांनी केले. या हवालदारांचे प्रशिक्षण ३ मार्च 20२५ ते १७ जानेवारी २०२६ असे ४४ आठवड्यांचे होते. त्यांचे मूलभूत प्रशिक्षण श्री विनीत कुमार, महानिरीक्षक, सहायक प्रशिक्षण केंद्र, सीमा सुरक्षा दल, चाकूर आणि कमाउंट मदनपाल सिंह यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. यामध्ये पश्चिम बंगालचे ४७, ओरीसाचे ४४, बिहारचे ४२, आसामचे ३३, गुजरातचे ३२, राजस्थानचे २३, केरळचे २२, पंजाबचे १९, उत्तर प्रदेशचे १७, जम्मू-काश्मीरमधील १४, मध्य प्रदेशचे १२, झारखंडचे १०, मेघालयचे ०७, गोव्याचे ०६, त्रिपुराचे ०४, हिमाचल प्रदेशचे ०१, दमन दिवचे ०१ या राज्यांतील एकुण ३३४
प्रशिक्षीत हवालदारांचा समावेश आहे. या समारंभात, त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षीत हवालदारांना महानिरीक्षक श्री विनीत कुमार यांच्या हस्ते मेडल आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यांत आले. याशिवाय अंतर्गत सुरक्षा कर्तव्य, सीमा व्यवस्थापन, कायदा आणि मानवाधिकार आदी विषयांवरही प्रशिक्षण देण्यात आले. महानिरीक्षक श्री विनीत कुमार प्रशिक्षीत नवीन हवालदारांना संबोधित करताना म्हणाले की, प्रशिक्षणानंतर त्यांना भारत-पाक आणि भारत-बांगलादेश यांच्यातील विशाल
सीमेच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाईल. हे सैनिक भारताच्या सीमेवरील कठीण प्रसंगांना तोंड देण्यास सक्षम आहेत. सीमा सुरक्षा दलात पाठवून आपल्या शूर पुत्रांना देशसेवेसाठी समर्पित करणाऱ्या त्यांच्या पालकांनाही नमन केले. यावेळी त्यांनी परेड मैदानावर उपस्थित अभ्यागत, विशेष पाहुणे, मान्यवर, शाळकरी मुले आणि प्रसारमाध्यमांचे आभार व्यक्त केले. दीक्षांत समारंभानंतर, मलखांब कला आणि शारीरिक कार्यक्षमतेचे भव्य प्रदर्शन तसेच देशभक्तीपर गीते प्रशिक्षीत हवालदारांनी सादर केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis