
नांदेड, 20 जानेवारी, (हिं.स.) नांदेड जिल्ह्यातील मनाठा येथे दत्ता मेघे उच्चशिक्षण व संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ९८० लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.
आमदार बाबुराव कदम यांनी दोन वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू केला. दर तीन महिन्यांत एक शिबिर याप्रमाणे वर्षात चार शिबिर आयोजित केले जातात. यामध्ये असाध्य रोगाचे निदान व उपचार मोफत केले जातात. आतापर्यंत अनेक लाभार्थीनी या शिबिरात भाग घेऊन पाच लक्ष रुपयांपर्यंत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या शिबिरात एकूण ९८४ रुग्णांनी या शिबिरात भाग घेतला होता, तर ३२४ लोकांची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. यात डोळे, गुडघे, हृदय या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
१९९५ पासून मी लोकांना वेगवेगळ्या योजनांत असाध्य रोगाचे उपचार मिळवून दिले आहेत. गरीब रुग्णांना महागडे उपचार परवडणारे नसतात. त्यामुळे त्यांना मोफत उपचार मिळावेत यासाठी हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबवीत आहोत. असे त्यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis