गंगापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यपदी राष्ट्रवादीचे अमोल जगताप
छत्रपती संभाजीनगर, 20 जानेवारी (हिं.स.)। गंगापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल जगताप यांची पहिल्या सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. नगर परिषदेच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्
Amol Jagtap, a corporator from the Nationalist Congress Party, has been elected as the Deputy Chairperson of the Gangapur Municipal Council.


छत्रपती संभाजीनगर, 20 जानेवारी (हिं.स.)।

गंगापूर नगर

परिषदेच्या उपनगराध्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल जगताप यांची पहिल्या सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. नगर परिषदेच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा झाली. या वेळी उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे संजय जाधव निवडून आले असून, दहा प्रभागांतील वीसपैकी ११ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत. भाजपाचे सात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक व एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे. येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अमोल सुभाषराव जगताप

यांचा एकमेव अर्ज आला होता त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी जगताप यांच्या अर्जावर सूचक म्हणून फैसल चाऊस यांची तर अनुमोदक म्हणून संतोष आंबीलवादे यांची नावे होती. या वेळी उपनगराध्यक्ष या पदासाठी एकमेव अर्ज प्रप्त झाल्याने पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष संजय जाधव यांनी अमोल जगताप यांची बिनविरोध निवड घोषित केली. या वेळी दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रवादीच्या

सुवर्णा संजय जाधव व भारतीय जनता पार्टीच्या शीतल संदेश गंगवाल यांची निवड करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष अमोल जगताप व स्वीकृत सदस्य सुवर्णा जाधव, शीतल गंगवाल यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी स्वागत केले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande