
नांदेड, 20 जानेवारी (हिं.स.)।श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रमाचे निमंत्रण केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांना राज्यस्तरीय समागम समिती सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिले.
यावेळी पोहरादेवीचे महंत बाबूसिंग महाराज (सहअध्यक्ष), समन्वय समितीचे अध्यक्ष रामसिंग महाराज, नांदेड गुरुद्वारा प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग, राज्यस्तरीय समन्वय आयोजन समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपाल सिंग, सदस्य चरणदीप सिंग (हॅप्पीसिंग), सतिश निहलानी आणि सहनिमंत्रक तेजासिंग बावरी आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis