
परभणी, 20 जानेवारी (हिं.स.)। पशुपक्ष्यांचे वर्तन व्यवहार हे माणसांना न समजणारे असले तरीही त्यांच्यात संदेशन होत असते. ठराविक ध्वनी व संकेतांच्या माध्यमातून वन्य प्राणी व वनस्पतीसुद्धा आपल्यावरील आपत्ती किंवा संकटाची जाणीव इतरांना करून देतात, पशुपक्षांची एक भाषा असते नेहमी पक्षांच्या नेहमी सहवासात असल्यास ती ओळखणे शक्य होते, अशी माहिती पक्षीमित्र माणिक पुरी यांनी दिली.
येथील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष रामेश्वर कदम हे होते. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. मुकुंदराज पाटील, मराठी विभाग प्रमुख डॉ. बालासाहेब काळे व प्रा. डॉ सा.द. सोनसळे, प्राचार्या डॉ. शेख शकीला, प्रा. सुरेश मोरे उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ. सातपुते म्हणाले की, पक्षी निरीक्षणाचा दुर्मिळ छंद असणारा हा माणूस परभणी जिल्ह्यातला असून त्यांचे दोन पुस्तके प्रकाशित होतात. त्यांना महत्त्वाचे पुरस्कार मिळतात ही बाब अतिशय अभिमानास्पद आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ बाळासाहेब काळे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis