
रत्नागिरी, 20 जानेवारी, (हिं. स.) : देवरूख येथील श्रीगणेश वेद पाठशाळेत येत्या गुरुवारी, दि. २२ जानेवारी रोजी डॉ. सौ. अपर्णा बेडेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
वेदपाठशाळेत माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीनिमित्ताने डॉ. बेडेकर यांचे 'ज्ञानेश्वरीची अपूर्वता' या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ६ वाजता व्याख्याने सुरू होईल. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी