
परभणी, 20 जानेवारी (हिं.स.)।मानवत येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आप्पा भिसे तर उपाध्यक्षपदी गणेश काळे यांची निवड करण्यात आली आहे.
येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात महत्त्वपूर्ण बैठकीत 2026 च्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे नियोजन करण्यात आले. या बैठकीत आगामी शिवजयंती उत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आप्पा भिसे यांची तर उपाध्यक्षपदी गणेश काळे यांची निवड करण्यात आली आहे. इतर महत्त्वाच्या जबाबदार्यांमध्ये सचिव मारुती होंडे, कार्याध्यक्ष प्रवीण मगर, कोषाध्यक्ष नयन कच्छवे, सहसचिव गोपाळ बारहाते आणि प्रताप बारहाते यांचा समावेश आहे.
या बैठकीला केशव शिंदे, उद्धव हारकर, अरुणराव देशमुख, गोविंद घाडगे, अॅड. संतोष लाडाणे, मोहन बारहाते, अॅड. सुनील जाधव, पांडुरंग जाधव यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis