पुणे आरटीओच्या तपासणीत 1877 ऑटोरिक्षा सदोष
पुणे, 20 जानेवारी (हिं.स.)।पुणे शहरातील ऑटो रिक्षाचालक मीटरनुसार भाडे न आकारता प्रवाशांकडून थेट मनमानी दराने पैसे वसूल करत आहेत.तसेच जादा प्रवाशी,भाडे नाकारणे उध्दट वर्तन, मीटर फास्ट अशा नियमांचे अल्लंघन केल्या प्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुण
पुणे आरटीओच्या तपासणीत 1877 ऑटोरिक्षा सदोष


पुणे, 20 जानेवारी (हिं.स.)।पुणे शहरातील ऑटो रिक्षाचालक मीटरनुसार भाडे न आकारता प्रवाशांकडून थेट मनमानी दराने पैसे वसूल करत आहेत.तसेच जादा प्रवाशी,भाडे नाकारणे उध्दट वर्तन, मीटर फास्ट अशा नियमांचे अल्लंघन केल्या प्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) कडून ऑटो रिक्षाचालकांना दणका देण्यात आला आहे.

एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यात ४,८९६ ऑटोरिक्षांची तपासणी करण्यात आली.यात १,८७७ दोषी आढळले आहेत.यावर कडक कारवाई करत आरटीओ प्रशासनाकडून १०५ परवाने निलंबिल करण्यात आले असून उर्वरित जणांवर दंडात्मक करवाई करून ८ लाख ६७ हजार रूपये दंड वसूल करण्यात आले आहे.रिक्षा चालकांच्या मनमानी करभारावर नियंञण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.गेल्या नऊ महिन्यात आरटीओच्या तपासणीत १,८७७ रिक्षा दोषी आढळले आहेत.यामध्ये जादा भाडे आकारलेले ८७, मिटर फास्ट ४६,जादा प्रवाशी २९,भाडे नाकारणे ११९,उध्दट वर्तन ८६, व इतर अशा एकून १,८७७ ऑटोरिक्षावर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.अनेक प्रवाशाना तक्रार कशी करावी आणि कुठे करावी यांची माहितीच नसते.त्यामुळे अनेक प्रवाशांची फसवणूक होत असते.अशा वेळी प्रवाशांनी काय केले पाहिजे यांची नेमकी कल्पनाच त्यांना नसते. यामुळे आर्थिक नुकसान आणि मानसिक ञासाला त्यांना सामोरे जावे लागते.कोणत्याही ऑटो रिक्षाचालकांनी नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल. प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारणे, भाडे नाकारणे,मिटर फास्ट असणे,उध्दट वर्तन करणे अशा तक्रारी असल्यास आपले नाव, मोबाईल क्रमांक फोटोसह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सऍप क्रमांकावर पाठवावे. प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई केली जाईल. असे पुणेप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी आवाहन केले आहे .

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande