किनवट, माहूर तालुक्यासाठी ६७ कोटींचा केंद्रीय निधी मंजूर
आ. केराम
किनवट, माहूर तालुक्यासाठी ६७ कोटींचा केंद्रीय निधी मंजूर


नांदेड, 20 जानेवारी (हिं.स.)।किनवट नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने जरी भारतीय जनता पक्षाला नाकारले असले, तरी शहराच्या विकासकामांना कोणतीही खीळ पडू दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका आ. भीमराव केराम यांनी व्यक्त केली. निवडणुकीदरम्यान दिलेल्या वचननाम्यानुसार केंद्रीय निधीतील चार प्रस्तावांपैकी दोन महत्त्वाच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून, त्यासाठी एकूण ६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये किनवटसाठी ४८ कोटी तर माहूरसाठी १९ कोटी रुपयांचा समावेश असून, लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

किनवट नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी विकासकामांच्या बाबतीत पक्ष कटीबद्ध आहे. किनवट शहरातील व्यापारी संकुल तसेच माहूर शहराच्या विकासासाठी केंद्रीय निधीतून दोन महत्त्वाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. आ. भीमराव केराम यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला असून, त्याचा थेट लाभ शहराच्या सर्वांगीण विकासाला होणार आहे

किनवट नगरपरिषद निवडणुकीत जनतेने आम्हाला नाकारले असले, तरी किनवट शहर हे माझेच आहे. निवडणुकीदरम्यान विकासकामांबाबत दिलेल्या वचनांपेक्षा अधिक गतीने कामे केली जातील. शहराच्या विकासासाठी कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. विकासकामांच्या बाबतीत पक्ष कमी पडणार नाही. दिलेल्या शब्दांना आम्ही प्राधान्य देतो आणि शहराच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाहीही आ. केराम यांनी दिली.

मंजूर विकास आराखड्यानुसार गुरांच्या बाजारासाठी १२ दुकाने विकसित करणे, तसेच विकास आराखडा २०२२ मधील आरक्षण क्रमांक १५ नुसार व्यापार संकुल व भाजीपाला मार्केट विकसित करणे अशी कामे या ४८ कोटींच्या निधीतून किनवट शहरात राबवली जाणार आहेत. निवडणुकीदरम्यान वचननाम्यात दिलेल्या शब्दांप्रमाणे विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरूच राहणार असून, विकासकामांना गती देण्याचा निर्णय आमदार केराम यांनी घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande