पुणे : खेड शिवापूर-देहूरोड सेवा रस्त्याचा विस्तार
पुणे, 20 जानेवारी (हिं.स.)। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने खेड शिवापूर ते देहूरोड दरम्यान असलेल्या सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिरिक्त मार्गिकेचे काम सुरु झाले आहे. याशिवाय या सेवा रस्त्याचा दर्जा चांगला राहण्यासाठी काँक्रिटीकरण केले जा
पुणे : खेड शिवापूर-देहूरोड सेवा रस्त्याचा विस्तार


पुणे, 20 जानेवारी (हिं.स.)। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने खेड शिवापूर ते देहूरोड दरम्यान असलेल्या सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिरिक्त मार्गिकेचे काम सुरु झाले आहे. याशिवाय या सेवा रस्त्याचा दर्जा चांगला राहण्यासाठी काँक्रिटीकरण केले जात आहे. ४५ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून त्यापैकी तीन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होण्यास किमान दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. यासाठी सुमारे ३२१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

अपघातांचे वाढते प्रमाण, वाहतूककोंडी तर कधी संथगतीने होणाऱ्या वाहतुकीवर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खेड शिवापूर ते देहूरोडदरम्यान सेवा रस्त्याचे विस्तारीकरण केले आहे. सध्या या रस्त्यावर एका बाजूने प्रत्येकी दोन मार्गिका आहे. यात आता आणखी एका मार्गिकेची भर पडणार आहे. दोन्ही बाजूचा विचार केल्यास दोन मार्गिका वाढणार आहे. परिणामी वाहतूक कोंडी अन् अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande