लातूर मनपात १४ वर्षानंतर प्रथमच महापौर पदासाठी सोडत
लातूर, 20 जानेवारी (हिं.स.)।२०१२ नंतर लातूर महानगरपालिकेत १४ वर्षानंतर प्रथमच महापौर पदासाठी सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान २०१२ ते २०२२ पर्यंत महानगरपालिकेला दोन खुल्या प्रवर्गातील महिला, पुरुष तर तीन ओबीसी प्रवर्गातील महापौर मिळाले. त्यामुळे यं
लातूर महानगरपालिका


लातूर, 20 जानेवारी (हिं.स.)।२०१२ नंतर लातूर महानगरपालिकेत १४ वर्षानंतर प्रथमच महापौर पदासाठी सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान २०१२ ते २०२२ पर्यंत महानगरपालिकेला दोन खुल्या प्रवर्गातील महिला, पुरुष तर तीन ओबीसी प्रवर्गातील महापौर मिळाले. त्यामुळे यंदा कोणत्या प्रवर्गासाठी महापौरांचे आरक्षण निघणार याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे. २२ जानेवारीला नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सहाव्या महापौरांचे आरक्षण काढण्यात येणार आहे.

मागील दोन निवडणूकीवेळी महापौर पदाचे आरक्षण हे सदस्यांच्या आरक्षण सोडतीपूर्वी काढण्यात आले होते. त्यामुळे त्या त्या राजकीय पक्षांनी महापौर पदाचा चेहरा कोण असावा हे निश्चित केले होते. यंदा मात्र महानगरपालिकेची निवडणूक झाली. लातूरकरांनी काँग्रेसला निर्विवाद सत्ता दिली. मात्र महापौरपद कोणत्या प्रवर्गाला असेल हे निश्चित झालेच नाही. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, खुल्या प्रवर्गातून काँग्रेसचे ४७ सदस्य निवडणूक आले आहेत. आरक्षण कोणत्या प्रवर्गाला सुटेल याची शक्यता लक्षात घेऊन तसे उमेदवार देण्यात आले होते. असे असले तरी आरक्षण सोडतीकडे लख लागून आहे.

लातूर महानगरपालिका, लातूर.

महानगरपालिकेतील आत्तापर्यंत महापौर, त्यांचा प्रवर्ग

अनुक्रमांक- नांव पक्ष आरक्षण कार्यकाळ- १. डॉ. स्मिता खानापूरे काँग्रेस सर्वसाधारण महिला- २०१२-२०१४

२. अख्तर मिस्त्री- काँग्रेस ओबीसी पुरुष- २०१४- २०१६

३. अॅड. दीपक सूळ- काँग्रेस ओबीसी पुरुष २०१६-२०१७४. सुरेश पवार - भाजप- सर्वसाधारण पुरुष- २०१७-२०१९

५. विक्रांत गोजमगुंडे- काँग्रेस ओबीसी पुरुष- २०१९-२०२२

आरक्षण एसस्सी, एसटीसाठी सुटल्यास हे असतील संभाव्य चेहरे

लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सुटल्यास काँग्रेसचे विकास कांबळे, मनोज थोरात, अंकीत भंडीकर, मनिषा बसपूरे, मंगेश सोनकांबळे, कांचन अजनीकर, विकास वाघमारे, जयश्री सोनकांबळे ही नांवे चर्चित आहेत. तर इतर प्रवर्गातील अहमदखाँ पठाण, सपना किसवे, अॅड. दीपक सूळ, सचिन बंडापल्ले, यांची नांवे आघाडीवर आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande