परळी पाणीपुरवठ्याचा नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांनी घेतला आढावा
बीड, 20 जानेवारी (हिं.स.)। परळी वैजनाथ नगर परिषदच्या पाणीपुरवठा विभागाचा आढावा नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांनी घेतला यावेळी नागापूर,मुख्य पाणीपुरवठा लाईन तसेच शहरातील वितरण व्यवस्था याबाबत कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेत तात्काळ उपाययोजना कर
नगराध्यक्षा सौपद्मश्री धर्माधिकारी


बीड, 20 जानेवारी (हिं.स.)। परळी वैजनाथ नगर परिषदच्या पाणीपुरवठा विभागाचा आढावा नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांनी घेतला यावेळी नागापूर,मुख्य पाणीपुरवठा लाईन तसेच शहरातील वितरण व्यवस्था याबाबत कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेत तात्काळ उपाययोजना करणे बाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

परळी नगरीतील नळाच्या पाण्याची वितरण व्यवस्था व आठवड्याचे स्थायी वेळापत्रक करणे बाबत तसेच परळी शहरात अनेक ठिकाणी वॉल बसवणे,दरमहा पाण्याची तपासणी करणे तसेच स्वतः नगर परिषदेने 'Chemist' अपॉइंट करुन स्वतः पाण्याचे सॅम्पल टेस्ट करणे,सर्व पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे वॉल गळती दूर करणे,याबाबत नगराध्यक्षांनी सूचना दिल्या.

लवकरच परळी शहराच्या वाढत्या नागरिक क्षेत्रासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेचा डीआरपीकेला जात असून परळी नगरीसाठी महत्वाची उपयुक्त योजना ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande