नवीन महापौर कोण ठरणार याकडे पुणेकरांचे लक्ष
पुणे, 20 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला आतापर्यंत जमली नाही अशी दैदिप्यमान कामगिरी भारतीय जनता पक्षाने केली आहे. महापालिकेच्या १६५ जागांपैकी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय ) मदतीने लढलेल्या भाज
PMC news


पुणे, 20 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला आतापर्यंत जमली नाही अशी दैदिप्यमान कामगिरी भारतीय जनता पक्षाने केली आहे. महापालिकेच्या १६५ जागांपैकी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय ) मदतीने लढलेल्या भाजपने ११९ जागांवर विजय मिळवून महापालिकेत एक हाती सत्ता मिळवली आहे. नऊ वर्षांपूर्वी झालेल्या २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजप ने ९८ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये यंदाच्या महापालिका निवडणुकीत २१ ने वाढ झाली आहे.महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांनी निर्विवाद वर्चस्व मिळविल्यानंतर पुणे शहराचे नवीन महापौर कोण ठरणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर निवडीचा मार्ग मोकळा होणार असून पुण्याच्या महापौरपदी कोण विराजमान होणार हे निश्चित होणार आहे.दरम्यान, पुणे महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक नुकतीच पार पडली. या महापालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी (२२ जानेवारी) काढण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या संदर्भात नगर विकास विभागाने अधिकृत पत्रकाद्वारे माहिती दिली असून, महापौर पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande