
अमरावती, 20 जानेवारी (हिं.स.)
अंजनगावसुर्जी नगरपालिका नवनिर्वाचित नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयीन ९- ४५ ला वेळेत हजर होऊन कर्मचाऱ्यांचे हजेरी रजिस्टर आपल्या ताब्यात घेऊन तपासले असता १३२ कर्मचाऱ्यांपैकी केवळ चार ते पाच कर्मचारी हजर दिसले त्यांनी याबाबत प्रसासनिक कारभाराबाबत रोष व्यक्त करत उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची चांगलीच कानउघडणी केली व यापुढे असा लेट लतीफ पणा झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल अश्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या यावेळी पालिका कार्यालयात धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते.स्थानिक नगरपालिका कार्यालयात १३२ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची संख्या आहेत. शासकीय कार्यालयीन वेळ ९:४५ असून आठवड्यातील पहिल्या दिवशी सोमवारी (ता. १९) नियमित वेळेत केवळ पाच कर्मचारी हजर दिसले व ११ वाजेपर्यंत १९ कर्मचाऱ्यासह अधिकारी कार्यालयात उपस्थित होते तर उर्वरित कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी कर्मचाऱ्यांच्या उशिरा येणाऱ्या सवयी बद्दल नाराजी व्यक्त केली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेखी समज देण्याच्या सूचना दिल्या नगरपालिका कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याच्या सूचना दिल्या अधिकारी मुख्यालयी हजर राहत नसेल तर त्या अधिकाऱ्याचे घर भाडे भत्ता रद्द करण्यात येईल अशा सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांची विविध विषयांवर चर्चा करून त्या भागातील समस्या व त्यावरील उपाय याबाबत माहिती घेतली.शहरातील एकूण किती घरकुल बांधकाम झाले व निधी अभावी रखलेले किती लाभार्थी आहेत याबाबत घरकुल विभाग प्रमुखांची चर्चा केली.शहरातील प्रमुख रस्ता असलेला टाकरखेडा नाका ते काठीपुरा या रस्त्यांचे तात्काळ लेवल लाऊन दुरुस्ती करण्याच्या सूचना बांधकाम विभाला देण्यात आल्या आहेत तसेच शहरातील एका महिन्याच्या आत खड्डे मुक्त करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी बांधकाम विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.शहरातील अनेक घरकुल लाभार्थ्यांचे निधी अभावी बांधकाम रखलेले आहेत त्याबाबत माहिती घेऊन निधी बाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी घरकुल विभाग प्रमुखांना दिल्या शिवाय अग्निशमन विभागातील प्रमुख अधिकारी हे उशिरा कार्यालयात येत असल्याने त्यांची चांगलीच कान उघडणी केली व यापुढे असे चालणार नाही अश्या सूचना दिल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज प्रथमच कार्यालयीन वेळेत हजर होऊन सर्व विभागातील कार्यालयीन माहिती जाणून घेतली यावेळी कार्यालयीन अधीक्षक सुनील उमक, करनिरिक्षक गजानन चक्रणारायन उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी