भाजप अध्यक्ष झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून नितीन नवीन यांचे अभिनंदन
नवी दिल्ली , 20 जानेवारी (हिं.स.)।नितीन नवीन यांची भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) १२व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत याची औपचारिक घोषणा
भाजप अध्यक्ष झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी नितीन नवीन यांचे केले अभिनंदन


नवी दिल्ली , 20 जानेवारी (हिं.स.)।नितीन नवीन यांची भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) १२व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत याची औपचारिक घोषणा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नितीन नवीन यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन व स्वागत केले. काही वेळातच नितीन नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी नितीन नवीन यांचे अभिनंदन करताना सांगितले की, जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. भाजपा संघटन पर्व हे देशातील कार्यकर्ताकेंद्रित विचारसरणीचे प्रतीक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपले नेतृत्व परंपरेतून घडते, अनुभवातून समृद्ध होते आणि जनसेवा व राष्ट्रसेवेच्या भावनेतून संघटनेला पुढे नेते. आम्ही शून्यापासून शिखरापर्यंतचा प्रवास पाहिला आहे.” यावेळी त्यांनी भाजपाचे सर्व माजी राष्ट्रीय अध्यक्ष यांचे अभिनंदन केले. पुढे पंतप्रधानांनी सांगितले की, आज भाजपाचा जितका भर संघटनेच्या विस्तारावर आहे, तितकाच भर कार्यकर्त्यांच्या घडणीवरही आहे. “मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही होतो, मात्र मी आधीपासून आणि आजही भाजपाचा कार्यकर्ता आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. “मी कार्यकर्ता आहे आणि नितीन नवीन माझे बॉस आहेत,” असे विधान करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “नितीन नवीन यांना केवळ भाजपामधीलच नव्हे, तर एनडीएतील सर्व घटक पक्षांशी समन्वय साधावा लागणार आहे. नितीन यांनी स्वतःला सक्षम नेतृत्व म्हणून सिद्ध केले आहे.” पुढील २५ वर्षे अत्यंत महत्त्वाची असून, या काळात विकसित भारताचे स्वप्न साकार होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. नितीन नवीन हे मिलेनियल पिढीचे प्रतिनिधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान म्हणाले, “देश आता २१व्या शतकातील एका निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. पहिली २५ वर्षे वेगाने गेली असून, पुढील २५ वर्षे अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. याच काळात विकसित भारताचे लक्ष्य गाठायचे आहे.” या नव्या पर्वाच्या सुरुवातीस नितीन नवीन भाजपाची समृद्ध परंपरा पुढे घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी सांगितले की, नितीन नवीन आजच्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करतात. लहानपणी रेडिओच्या माध्यमातून माहिती घेणाऱ्या आणि आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)सारख्या आधुनिक तंत्रज्ञानासोबत काम करणाऱ्या पिढीतून ते आले आहेत. त्यामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला शिकण्याची आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल.पंतप्रधान मोदी यांनी यावर्षी जनसंघाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याची आठवण करून दिली आणि ज्यांनी पिढ्यान्पिढ्या त्याग, तपस्या व बलिदान देऊन संघटना मजबूत केली, अशा सर्व कुटुंबांचा सन्मान केला.

यापूर्वी नितीन नवीन यांनी दिल्लीतील झंडेवाला मंदिर, भगवान वाल्मीकि मंदिर, प्राचीन हनुमान मंदिर आणि गुरुद्वारा बंगला साहिब येथे जाऊन दर्शन घेतले होते. वयाच्या ४५व्या वर्षी नितीन नवीन हे भाजपाचे आतापर्यंतचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरले आहेत. याआधी अमित शहा ४९व्या वर्षी पक्षाचे अध्यक्ष झाले होते. उल्लेखनीय म्हणजे, सोमवारी भाजपाच्या मुख्यालयात अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. अन्य कोणत्याही उमेदवाराने नामांकन न भरल्यामुळे नितीन नवीन यांची बिनविरोध निवड झाली. १४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande