अक्षय कुमार कार अपघात प्रकरणी पोलिसांनी चालकावर केला गुन्हा दाखल
मुंबई, 20 जानेवारी (हिं.स.)।सोमवारी रात्री अभिनेता अक्षय कुमार यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका कारचा आणि एका ऑटो-रिक्षाचा अपघात झाला. या धडकेत कार उलटली होती. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले आहे. जुहू
Police register case against driver


मुंबई, 20 जानेवारी (हिं.स.)।सोमवारी रात्री अभिनेता अक्षय कुमार यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका कारचा आणि एका ऑटो-रिक्षाचा अपघात झाला. या धडकेत कार उलटली होती. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले आहे. जुहू पोलीस ठाण्यात संबंधित चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, दोन कार आणि एका ऑटो-रिक्षाच्या धडकेत दोन जण जखमी झाले आहेत. आरोपीचे नाव राधेश्याम राय असे असून त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 281, 125(अ) आणि 125(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दरम्यान, अपघातस्थळावरील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये स्थानिक नागरिक अधिकारी वर्गाला मदत करत मलब्यात अडकलेल्या एका जखमी व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढताना दिसत आहेत. या अपघातात ऑटो-रिक्षा चालकही जखमी झाला असून, त्याच्या भावाच्या म्हणण्यानुसार त्याची प्रकृती गंभीर आहे.

जुहू परिसरात सोमवारी रात्री भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज कारने मागून एका ऑटो-रिक्षाला धडक दिली. या धडकेमुळे ऑटो-रिक्षा उलटला आणि तो थेट अभिनेता अक्षय कुमार यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका कारवर आदळला. अपघात इतका भीषण होता की ऑटो-रिक्षा पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला, तर अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील कारही उलटली.मात्र, अपघाताच्या वेळी अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना त्या कारमध्ये नव्हते. ते ताफ्यातील पुढील कारमध्ये प्रवास करत होते.त्यांच्या कारलाही किरकोळ धक्का बसला, मात्र मोठे नुकसान झाले नाही.

ऑटो-रिक्षा चालकाचा भाऊ मोहम्मद समीर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ही घटना सोमवारी 19 जानेवारी रोजी रात्री सुमारे 8:30 वाजता घडली. “माझ्या भावाचा रिक्षा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. आमची एकच मागणी आहे की त्याला योग्य वैद्यकीय उपचार आणि आवश्यक औषधे मिळावीत, तसेच नुकसान झालेल्या रिक्षासाठी भरपाई देण्यात यावी,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अभिनेता अक्षय कुमार यांनी या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande