पंढरपुरातील विठुरायाची पाच वर्षांत २०० कोटींचे उत्पन्न, सात पटीने वाढ
सोलापूर, 20 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्रातील गोरगरिबांचे आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे लाडके दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची दिवसेंदिवस श्रीमंती वाढू लागली आहे. भक्तांनी गेल्या पाच वर्षात विठुरायाच्या चरणावर तब्बल दोनशे कोटीहून अधिक रुपयांचे दान अर
Vithal


सोलापूर, 20 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्रातील गोरगरिबांचे आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे लाडके दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची दिवसेंदिवस श्रीमंती वाढू लागली आहे. भक्तांनी गेल्या पाच वर्षात विठुरायाच्या चरणावर तब्बल दोनशे कोटीहून अधिक रुपयांचे दान अर्पण करून देवाचा खजिना अधिक समृध्द केला आहे. श्री विठ्ठल मंदिर समितीने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याने राज्यासह देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील लक्षणीय वाढली आहे.आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या प्रमुख चार यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला येतात. या शिवाय दररोज किमान एक लाखभर भाविक पंढरीत येऊन विठुरायाच्या चरणी लीन होतात. वर्षभरामध्ये एक कोटीपेक्षा अधिक भाविक पंढरीत येतात. येणारे भाविक श्री विठ्ठल चरणावर स्वखुशीने दान अर्पण करतात. यामध्ये रोख रक्कमेसह सोने, चांदीचे दागिनेही देवाला अर्पण केले जातात.नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात समितीला मिळालेल्या उत्पन्नाचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडून काढले आहेत. मागील एका वर्षात समितीला तब्बल ६९ कोटी ३० लाख ९७ हजार ४१२ रुपयांचे विविध माध्यमातून उत्पन्न मिळाले आहे. तर २०२० ते २०२५ या पाच वर्षाच्या काळात मंदिर समितीला २०० कोटी २१ लाख ४८ हजार ६१५ रुपयांचे भरघोस असे उत्पन्न मिळाले आहे. या काळात सुमारे ७ कोटीहून अधिक भाविकांनी पंढरीत येऊन हजेरी लावल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande