पुण्याच्या विकासाला प्राधान्य द्या; नवनिर्वाचित नगरसेवकांना अजित पवार यांचा सल्ला
पुणे, 20 जानेवारी (हिं.स.)नगरसेवक म्हणून काम करताना महापालिकेची प्रक्रिया, कायदे समजून घ्या. शहराच्या विकासासाठी चांगले काम करा, लोकाभिमुख कामांना प्राधान्य द्या, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
ajit pawar


पुणे, 20 जानेवारी (हिं.स.)नगरसेवक म्हणून काम करताना महापालिकेची प्रक्रिया, कायदे समजून घ्या. शहराच्या विकासासाठी चांगले काम करा, लोकाभिमुख कामांना प्राधान्य द्या, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन केले. या वेळी पक्षाच्या गटनेता निवडीबाबतही चर्चा झाली. त्या वेळी गटनेता निवडीचे अधिकार पक्षाच्या नेत्यांकडून पवार यांना देण्यात आले.

महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रचाराची धुरा हाती घेत शहरामध्ये भाजप विरुद्ध प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. प्रारंभी एकतर्फी वाटणाऱ्या महापालिका निवडणुकीत पवार स्वतः उतरल्याने आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले होते.

मात्र, निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला २७ जागांवर समाधान मानावे लागले होते. निकालानंतर पवार यांनी सोमवारी बारामती होस्टेल येथे बैठक आयोजित करत पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत करून त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील व आमदार चेतन तुपे उपस्थित होते. नवनिर्वाचित नगरसेवकांकडून पवार यांचा सत्कार करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande