परभणी : सेलू रेल्वे स्थानकाचा सहा महिन्यांत होणार कायापालट
परभणी, 20 जानेवारी (हिं.स.)।सेलू शहरातील रेल्वे स्थानकाचा ‘पंतप्रधान अमृत रेल्वे स्थानक विकास योजने’अंतर्गत सहा महिन्यांत कायापालट होणार आहे. या रेल्वे स्टेशनचे काम प्रगतीपथावर सुरु असून अजस्त्र महाकाय 500 टनच्या क्रेनच्या साह्याने अकरा गार्डरचा रे
परभणी : सेलू रेल्वे स्थानकाचा सहा महिन्यांत होणार कायापालट


परभणी, 20 जानेवारी (हिं.स.)।सेलू शहरातील रेल्वे स्थानकाचा ‘पंतप्रधान अमृत रेल्वे स्थानक विकास योजने’अंतर्गत सहा महिन्यांत कायापालट होणार आहे. या रेल्वे स्टेशनचे काम प्रगतीपथावर सुरु असून अजस्त्र महाकाय 500 टनच्या क्रेनच्या साह्याने अकरा गार्डरचा रेल्वे पादचारी पूलाचे काम पूर्णत्वाकडे आहे.

या नूतनीकरण कामांचा शुभारंभ जून 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला होता. यावेळी तत्कालीन आमदार तथा विद्यमान पालकमंत्री व राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर प्रमुख उपस्थित होत्या. या सर्व विकासकामांसाठी केंद्र सरकारने 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट, एस्केलेटर, दादरा, प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, उपहारगृह, स्वयंरोजगारासाठी स्टॉल, प्रवासी प्रतीक्षालय (वेटिंग हॉल) आदी सुविधा उभारण्यात येणार आहेत. तसेच स्थानकाच्या दर्शनी भिंतीवर वालूर येथील अष्टकोणी बारव (स्टेपवेल) याचे रेखांकित चित्र साकारण्यात येणार आहे.

रेल्वे स्थानक परिसरात सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज, श्री साई बाबा, श्री संत गोविंद बाबा, श्रीक्षेत्र सिमुरगव्हाण माऊली, उपपीठ नानिज धाम यांच्यासह परिसरातील धार्मिक व पर्यटन स्थळांची माहिती नकाशासह दर्शविण्यात येणार आहे. स्थानकाचे प्रवेशद्वार व कमान तीर्थक्षेत्राच्या दर्जाला साजेशी उभारण्यात येणार असून हे सर्व काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, सेलू शहराचे अद्ययावत रेल्वे स्थानकाचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न या विकासकामांमुळे पूर्ण होणार आहे. विविध संत-महात्म्यांची चित्रे व माहिती स्थानकावर उपलब्ध झाल्याने सेलूची ‘संतांची भूमी’ अशी वेगळी ओळख निर्माण होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande