साेलापुरातील चार तालुक्यांतील जागांवरून नेत्यांमध्ये संघर्ष
सोलापूर, 20 जानेवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शक्य तेथे युती करणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, पक्षांतर्गत जागांवरून दक्षिण - उत्तर सोलापूर व मंगळवेढा - पंढरपूर ता
Jaykumar gore newss


सोलापूर, 20 जानेवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शक्य तेथे युती करणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, पक्षांतर्गत जागांवरून दक्षिण - उत्तर सोलापूर व मंगळवेढा - पंढरपूर तालुक्यांतील जागांवरून नेत्यांत ताणाताणी वाढल्याने संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसशी तर सांगोल्यात शिवसेनेशी युतीची चर्चा सुरू आहे.पालकमंत्री गोरे यांनी दिवसभरात तालुकानिहाय नेत्यांच्या बैठका घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा केली. त्यानंतर शक्य तेथे युती करून लढणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र दरम्यान, झालेल्या बैठकांत दक्षिण व उत्तर सोलापुरातील जागांवरून आमदार सुभाष देशमुख व माजी आमदार दिलीप माने तर मंगळवेढा - पंढरपुरातील जागांवरून आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात ताणाताणी झाल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. या चारही तालुक्यांतील जागांबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार - सावंत, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे हे आमदार, राजन पाटील, दिलीप माने, प्रशांत परिचारक, संजयमामा शिंदे, राजेंद्र राऊत, यशवंत माने, शहाजी पाटील हे माजी आमदार यांच्यासह रणजितसिंह शिंदे, प्रा. रामदास झोळ आदींनी पालकमंत्री गोरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande