
सोलापूर, 20 जानेवारी (हिं.स.)।मुंबई, गोव्यानंतर आता इंदौरला विमानसेवा सुरू होणार आहे. पहिले उड्डाण बुधवारी होणार आहे. मुंबईला जाणारे विमान हेच पुढे इंदौरला जाणार आहे. ही वनस्टॉप विमानसेवा राहणार असून, सोलापुरातून मोठा प्रतिसाद मिळण्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.मुंबईला जाणारे विमानच पुढे इंदौरला पोचणार आहे. हे विमान दुपारी ३ वाजता सोलापुरातून उड्डाण घेऊन मुंबई स्टॉप घेत पुढे इंदौरला सायंकाळी ५.३० वाजता पोचणार आहे. इंदौर मोठी बाजारपेठ असून, ती या विमानसेवेमुळे सोलापूरशी जोडली जाणार आहे. शिवाय उज्जैन येथे महाकाल दर्शनाची सोय होणार आहे.इंदौर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असून, त्या ठिकाणीही जाण्याची सुविधा मिळणार आहे. तिकीटदर ४९०० रुपये असून, याचा सोलापूरसह शेजारील जिल्ह्यातील व्यापारी, कारखानदार व व्यावसायिकांना लाभ होणार आहे. इंदौरहून सोलापूरसाठी विमानसेवेची वेळ दिली नाही, पण तिथून मुंबईसाठी विमानसेवा असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड